तंबी / DISCLAIMER: ही अधिकृत शासकीय वेबसाईट नाही. हे केवळ प्रात्यक्षिक (Demo / Academic Project) आहे. वास्तविक वापरासाठी नाही. (Notice: Demo web application for demonstration purposes only.)
महाराष्ट्र शासन / Govt. of Maharashtra
सूचना / Updates
📢 रतडगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही (CCTV) सिस्टीम देणगी म्हणून बसवण्यात आली आहे.          📢 ग्रामसभा सूचना: आगामी ग्रामसभा नोटीस फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. कृपया सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करावे.          📢 जन्म, मृत्यू, उत्पन्न व रहिवासी दाखल्यांचे ऑनलाईन अर्ज पोर्टलवरून स्वीकारले जात आहेत.
Logo
रतडगाव
ग्रामपंचायत रतडगाव
Official Notices

ग्रामपंचायत सूचना फलक

ग्रामसभा, शासकीय बैठका व परिपत्रकांची अधिकृत माहिती

02/08/2026 आगामी कार्यक्रम / Urgent Event
विशेष ग्रामसभा नोटीस – ३ ऑगस्ट २०२६

सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की रतडगाव, ता. जि. अहिल्यानगर ची "विशेष ग्रामसभा" सोमवार दिनांक 3/8/2026 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित केली आहे, तरी सर्व ग्रामस्थांनी सभेसाठी उपस्थित रहावे ही विनंती.

31/07/2026 आगामी कार्यक्रम / Urgent Event
महत्त्वाची सूचना – ग्रामपंचायत निवडणूक

रतडगाव ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीची घोषणा दिवाळीच्या कालावधीत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामस्थांनी निवडणुकीसंदर्भातील अधिकृत सूचना, निवडणूक कार्यक्रम, उमेदवारी अर्ज, मतदानाची तारीख व इतर महत्त्वाची माहिती याकडे लक्ष द्यावे. सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी तसेच दुरुस्ती आवश्यक असल्यास BLO / निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. आपले मत – आपल्या गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे!

28/07/2026 अधिकृत नोटीस
महत्त्वाची सूचना – SIR मतदार नोंदणी

SIR (Special Intensive Revision) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ज्या नागरिकांची मतदार नोंदणी झालेली नाही, तसेच ज्यांना मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करायचे आहे किंवा आवश्यक दुरुस्ती करायची आहे, त्यांनी आपल्या संबंधित BLO (Booth Level Officer) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. तरी सर्व पात्र ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घेऊन आपली मतदार नोंदणी व मतदार यादीतील माहिती तपासून घ्यावी. लोकशाही बळकट करण्यासाठी आपला सहभाग महत्त्वाचा आहे.

25/07/2026 आगामी कार्यक्रम / Urgent Event
स्वातंत्र्य दिन सोहळा – १५ ऑगस्ट २०२६

आपल्या रतडगाव गावामध्ये १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय पर्वानिमित्त शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रतडगाव येथे ध्वजारोहण व स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या राष्ट्रीय उत्सवाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. आपली उपस्थिती हीच देशभक्तीची खरी भावना आहे. जय हिंद! वंदे मातरम्!

21/07/2026 अधिकृत नोटीस
महत्त्वाची सूचना – शाळेच्या परिसरात प्रवेशास मनाई

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रतडगाव येथील विद्यार्थ्यांची सुरक्षितता व शाळेच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी शाळेच्या परिसरात CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्व ग्रामस्थांनी व नागरिकांनी शाळेच्या नियमित वेळेपूर्वी व शाळा सुटल्यानंतर शाळेच्या आवारात विनापरवानगी प्रवेश करू नये. अनधिकृत प्रवेश करणे, विनाकारण थांबणे किंवा मालमत्तेला नुकसान पोहोचविणे कठोरपणे निषिद्ध आहे. परिसर CCTV निगराणीखाली आहे. – शाळा व्यवस्थापन / ग्रामस्थ, रतडगाव