Ratadgaon Zilla Parishad Primary School | गुणवत्तेचे व संस्कारांचे आदर्श केंद्र
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रतडगाव ही केवळ शिक्षण देणारी शाळा न राहता विद्यार्थ्यांना modern digital classrooms, सुरक्षित, स्वच्छ, तंत्रज्ञानाधारित आणि उच्च दर्जाच्या गुणवत्तेचे वातावरण मिळावे, हे आमचे ध्येय आहे.
रतडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गावातील गुणवत्तापूर्ण आणि डिजिटल शिक्षणाचे मुख्य केंद्र आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी येथे मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश व पोषण आहाराची सोय उपलब्ध आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रतडगाव येथील विद्यार्थ्यांची सुरक्षितता व शाळेच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी शाळेच्या परिसरात CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्व ग्रामस्थांनी व नागरिकांनी शाळेच्या नियमित वेळेपूर्वी व शाळा सुटल्यानंतर शाळेच्या आवारात विनापरवानगी प्रवेश करू नये.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सुरक्षिततेसाठी Bank of Baroda यांच्या CSR निधीतून मोलाचे सहकार्य प्राप्त झाले.
विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि हिरवाईने नटलेले सुंदर परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने कामाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शाळेच्या परिसराची निगराणी अधिक सक्षम करण्यासाठी पूर्ण CCTV सिस्टीम देणगी म्हणून बसवून देण्यात आली.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे आनंदाने स्वागत करण्यासाठी Welcome Day सोहळा आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना वह्या व मिठाईचे वाटप करण्यात आले.
"First Step" उपक्रमांतर्गत शाळेच्या परिसरात ३५ झाडांचे वृक्षारोपण करतानाचे व हिरवाई निर्माण करतानाचे खास चित्रीकरण.
शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रतडगाव येथे ध्वजारोहण व स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्व ग्रामस्त, महिला, विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे.